संपर्क साधा
Talk With AdminLocation
न्यू वंदना को.ऑ.हौ. सोसायटी, ३रा मजला, लाल बहादूर शास्त्री मार्ग, वंदना सिनेमाजवळ, ठाणे
Working Hours
Weekends: Closed
Phone & Email
०२२ – २५९८६२७०
info@wayam.in
Send a Message
FAQ
सतत विचारले जाणारे प्रश्न
या स्पर्धेतून तुम्हाला काय मिळेल ?
‘बहुरंगी बहर’ स्पर्धा म्हणजे काय ?
‘बहुरंगी बहर’ म्हणजे बहुअंगाने बहरणाऱ्या मुलांचा शोध. बाकी बऱ्याच स्पर्धेमध्ये फक्त एका विशिष्ट कलेकडे भर दिला जातो. पण सगळ्या बाजूने छान बहरत आहे, फुलत आहे अशी मुलं ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये दडलेली आहेत. अशा मुलांच्या शोधासाठीच ‘बहुरंगी बहर’ प्रकल्प काढण्यात आला आहे.
'बहुरंगी बहर' प्रश्नावली कशी Download करायची?
https://www.wayam.in/bahurangi-bahar/index.html या लिंक वर जाऊन ‘बहुरंगी बहर’ प्रश्नावली या बटनावर क्लिक करा. मग तुमची वैयक्तिक माहिती भरून १०० रु. भरा. पेमेंट झाल्यावर (Click Here to Download Bahurangi Bahar Questionnaire) या बटनावर क्लिक करा. प्रश्नावली तुमच्या डाउनलोड लिस्ट मध्ये दिसेल.
‘बहुरंगी बहर’ स्पर्धा दरवर्षी का आयोजित आयोजित केली पाहिजे?
बहुरंगी बुद्धीमत्ता असलेल्या मुलांची दरवर्षी दखल घेतली गेली पाहजे आणि नवीन येणाऱ्या पिढीला त्यांच्या उमलत्या वयात योग्य मार्गदर्शन मिळाले पाहिजे या उद्देशाने ‘बहुरंगी बहर’ स्पर्धा दरवर्षी आयोजित केली गेली जाते.
‘बहुरंगी बुद्धीमत्ता’ म्हणजे काय?
बहुरंगी बुद्धीमत्ता म्हणजेच ‘Thoughts of multiple intelligence’! तबल्याच्या लयतालाचे गणित सहज आत्मसात करणारी व्यक्ती पुस्तकी गणितात कच्ची ठरते… एखाद्या क्रीडाप्रकारामध्ये अप्रतिम कौशल्य दाखवणारी व्यक्ती डबल ग्रॅज्युएट असायलाच हवी असे नाही… कुठल्याही बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण न घेता कर्तृत्ववान उद्योजक बनता येते. म्हणजे ज्या व्यक्तीमध्ये बुद्धीचे एकापेक्षा जास्त Flavors आहेत आणि त्या व्यक्तीचे आयुष्य सर्वांगाने फुलून येते तो / ती जगण्याचा आनंद तर लुटतेच, पण समाजालाही योगदान देऊ शकते.
‘बहुरंगी बहर’ स्पर्धेत भाग घेतल्यानंतर मुलांमध्ये काय बदल होतात ?
स्पर्धेत भाग घेतल्यानंतर मुलांचा आत्मविश्वास वाढतोच त्याचबरोबर त्यांची चहू बाजूने विचार करण्याची क्षमताही वाढते.
‘बहुरंगी बहर’ स्पर्धेमध्ये मुलांनी का भाग घ्यावा?
हो, या स्पर्धेमुळे मुलांची शैक्षणिक, सामाजिक, आणि मानसिक जडण-घडण केली जाते. तसेच ‘बहुरंगी बहर’च्या विजेत्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळेल.
‘बहुरंगी बहर’ प्रश्नावली मुलांनी का सोडवावी?
एक असं हक्काचं व्यासपीठ जिथे मुलांना त्यांची मतं मोकळेपणाने मांडता येतात. ज्यात मुलं विचार काय करतात, त्यांची निर्णयक्षमता कशी आहे. त्या मुलांची एखाद्या संकल्पनेवरची मतं काय आहेत आणि ती कशी मांडतात असे स्वतः ची ओळख करून देणारे प्रश्न या प्रश्नवली मध्ये विचारले जातात.
'बहुरंगी बहर' प्रश्नावलीची उत्तरं कशी पाठवायची?
तुम्ही तुमची उत्तरं स्कॅन करून आम्हाला iphwayamspardha17@gmail.com या ई-मेल आयडी वर पाठवा.
किंवा
‘वयम्’, न्यू वंदना को.ऑ.हौ. सोसायटी, ३ रा मजला, लाल बहादूर शास्त्री मार्ग, वंदना सिनेमाजवळ, ठाणे ४००६०२ या पत्त्यावर कुरियर करू शकता.