Select Page

'बहुरंगी बहर’ - ‘हरहुन्नरी’ मुलांचा शोध-प्रकल्प!

सप्रेम शुभेच्छा!

गेली चार वर्षे ऑगस्ट महिन्यात आम्हाला वेध लागतात, ‘बहुरंगी बहर’ स्पर्धेत सहभागी झालेल्यांच्या उत्तरपत्रिका वाचण्याचे! यंदा मात्र करोंनाने निर्माण केलेल्या संकटामुळे आम्ही ‘बहुरंगी बहर’ ही स्पर्धा सध्यातरी घेऊ शकणार नाही. तसेच २०१९ मधील ‘बहुरंगी बहर’ विजेत्यांसाठी IPH आणि वयम् मासिक यांच्यातर्फे घेण्यात येणारे व्यक्तिमत्व शिबीरही अद्याप होऊ शकलेले नाही. परिस्थिती सुरळीत झाल्यावर पुढील सूचना देऊ.

 

बहुरंगी बहर बद्दल

‘बहुरंगी बहर’

तुम्ही विचाराल, काय भानगड आहे? आणि कोणासाठी आहे ही स्पर्धा? … महाराष्ट्रातील सातवी ते नववी इयत्तेतील हरहुन्नरी विद्यार्थी-विद्यार्थिनी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. आता प्रश्न येईल की ‘हरहुन्नरी’ म्हणजे नेमके कोण कोण?

हळूहळू लक्षात येऊ लागले की बुद्धीमत्ता काही एवढ्यापुरती मर्यादित नाही. कारण अशा मापनामध्ये उत्कृष्ट असलेले अनेकजण प्रत्यक्ष जीवनामध्ये मात्र यशस्वी ठरतात, असे नाही. अशा निरीक्षणांमुळे दोन विषयांमधल्या संशोधनाला गती मिळाली.

पहिला विषय आला, ‘भावनांक’- भावनिक दृष्टीने जी व्यक्ती अधिक सक्षम ती यशस्वी आणि आनंदी होण्याची शक्यता जास्त. भावनिक सक्षमता येते कशातून? स्वतःच्या आणि इतरांच्या भावनांची जाण, त्यांचा स्वीकार आणि त्यानुसार केलेले अनुरूप वर्तन! संस्कृतमधला ‘प्रज्ञा’ हा शब्द पारंपरिक व्याख्येतील बुद्धिमत्ता आणि उत्तम भावनांक यांच्या संयोगासाठी वापरला आहे.

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी हे पत्र-

‘बुद्धिमत्ता’ म्हणजे नेमके काय ह्या प्रश्नाचे उत्तर काळानुसार येणाऱ्या शास्त्रीय माहितीच्या आधारे बदलत गेलेले आहे. गेल्या शतकामध्ये जसजसा मानसशास्त्राचा आणि शिक्षणशास्त्राचा विकास होऊ लागला, तसे बुद्धिमत्ता म्हणजे नेमके काय आणि त्याचे मापन कसे करावे, अशा समस्या संशोधाकांसमोर आल्या. तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता,

गणिती विचार करण्याची क्षमता, व्यवहाराचे आकलन, सामान्यज्ञान, अडचणींची उकल करण्याचे कसब अशा अनेक गुणांचा अंतर्भाव बुद्धिमत्तेमध्ये केला गेला. त्या आधारे अनेक IQ टेस्ट म्हणजे बुद्धिमापन चाचण्याही उपयोगात आल्या.

Mission

 बहुरंगी बहर Mission & Vision

दुसरा विषय म्हणजे, ‘Thoughts of multiple intelligence’ अर्थात ‘बहुरंगी बुद्धी’! तबल्याच्या लयतालाचे गणित सहज आत्मसात करणारी व्यक्ती पुस्तकी गणितात कच्ची ठरते… एखाद्या क्रीडाप्रकारामध्ये अप्रतिम कौशल्य दाखवणारी व्यक्ती डबल ग्रॅज्युएट असायलाच हवी असे नाही… कुठल्याही बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण न घेता कर्तृत्ववान उद्योजक बनता येते… व्यवहारामध्ये सतत दिसणाऱ्या अशा अनेक उदाहरणांनी हे सिद्ध केले की, बुद्धीच्या व्याखेला पारंपरिक चौकटीतून मुक्त केले पाहिजे. संशोधाकांनी बुद्धीमत्तेचे ६० च्या वर flavoursशोधले. काही जण अंकांबरोबरची बुद्धिमत्ता घेऊन येतात (प्रा. रामानुज), तर काही सूरलयीची बुद्धिमत्ता (लता मंगेशकर), काहीजण यंत्राबरोबर तन्मयतेने आणि सहजपणे काम करू शकतात, तर काहीजण माणसांबरोबर… काहींची बुद्धी कोणत्याही क्षेत्रातील सिद्धान्ताना हात घालते, तर काहीजण त्या सिद्धान्ताचा व्यवहारात उपयोग करीत एखादे उपकरण तयार करतात.

A Word – ‘हरहुन्नरी’ म्हणजे नेमके कोण कोण?

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी हे पत्र

गंमत म्हणजे कधीकधी काही माणसे एका पद्धतीच्या बुद्धिमत्तेमध्ये प्रचंड पारंगत असतात, पण त्यात समतोल असतो असे नाही… म्हणजे उत्तम शास्त्रज्ञ हा व्यवहाराला कुचकामी ठरू शकतो, तर अत्यंत निर्मितीक्षम कलावंत काही वेळा जवळच्या नातेवाइकांना ओळखूसुद्धा शकणार नाही.

म्हणजे ज्या व्यक्तीमध्ये बुद्धीचे एकापेक्षा जास्त Flavors आहेत आणि त्या व्यक्तीचे आयुष्य सर्वांगाने फुलून येते तो / ती जगण्याचा आनंद तर लुटतेच, पण समाजालाही योगदान देऊ शकते.

या विचारातून या प्रयोगाचा जन्म झाला. आपण जरी ह्या उपक्रमाला ‘स्पर्धा’ असे नाव दिले असले तरी तो एक शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसशास्त्रीय प्रकल्प आहे, असे म्हटले तरी चालेल. उमलत्या वयामध्ये व्यक्तिमत्वाचे असे बहरते पैलू समजापुढे आले तर अशा इतर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल. या उपक्रमामध्ये भाग घेणाऱ्या आणि पात्रता फेऱ्यांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी भविष्यामध्ये खास विकासशिबिरे, गुणवत्तावर्धक मार्गदर्शन अशा योजना प्रत्यक्षात आणण्याचा आमचा विचार आहे.

या उपक्रमाचे स्वरूप नेमके कसे आहे आणि त्यातील टप्पे कोणते यासंदर्भातील सविस्तर माहिती ‘वयम्’च्या याच अंकामध्ये तुम्हांला वाचायला मिळणारच आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वामध्ये अगदी प्रथमच हाती घेतल्या गेलेल्या या प्रकल्पाला विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचा उत्तम प्रतिसाद मिळेल असा आम्हांला विश्वास आहे.

शुभदा चौकर ( संपादक ‘वयम्’ )

NOTE

बहुरंगी बहर बद्दल FAQs

01

FAQ

What is Bahurangi Bahar?

02

FAQ

Why conducted Every Year?

03

FAQ

How to download questionnaire?
जरा परखा

‘बहुरंगी बहर’ स्पर्धेमुळे सिद्धार्थ मध्ये झालेला बद्दल..

'बहुरंगी बहर' म्हणजे नक्की काय?
बहुरंगी बहर' ही कल्पना कशी सुरु झाली ?
'Bahurangi Bahar' 2019- Personality Development Competition for kids
'बहुरंगी बहर' या स्पर्धेमध्ये मुलांनी भाग का घ्यावा?
'बहुरंगी बहर' स्पर्धेचे फायदे..

दरवर्षी विद्यार्थ्यांचा सहभाग

विजेते

जिल्हे

वर्षे आयोजित

संपर्क

Location: ‘वयम्’
न्यू वंदना को.ऑ.हौ. सोसायटी, ३ रा मजला, लाल बहादूर शास्त्री मार्ग, वंदना सिनेमाजवळ, ठाणे

Telephone: ०२२ – २५९८६२७० / ७१ / ७२ / ७३

Email: info@wayam.in

Powered By