Select Page

About

About ‘बहुरंगी बहर’
Get Involved
Our Mission

‘बहुरंगी बहर’ स्पर्धा

ठाण्याच्या IPH संस्था आणि ‘वयम्’ मासिक यांच्यातर्फे इयत्ता ७वी ते ९वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आणि होमस्कूलिंगसाठी सुद्धा.


गेली ३ वर्षे तुफान यशस्वी ठरलेल्या ‘बहुरंगी बहर’ स्पर्धेचं हे चौथे वर्ष…तुम्हाला आवडेल आणि सहभागी व्हायला मजा येईल अशी ही स्पर्धा म्हणजेच, ‘बहुरंगी बहर’- उमलणारे व्यक्तिमत्व स्पर्धा!

Our Insights

‘बहुरंगी बहर’ २०१९ ची क्षणचित्रे:

‘बहुरंगी बहर’ च्या अंतिम फेरीतील स्पर्धकांना १० वी च्या बोर्ड परीक्षेत ९०% पेक्षा अधिक मार्क्स मिळाले आहेत. 

ठाण्यातील आयपीएच संस्था तसेच ‘वयम्’ यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘बहुरंगी बहर’ या स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी दि. ३ नोव्हेंबर २०१९ रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे रंगली. ‘बहुरंगी बहर’ २०१९ ची क्षणचित्रे:

बहुरंगी बहर’ हि स्पर्धा म्हणजे नक्की काय आहे? (What is Bahurangi Bahar Spardha?) या स्पर्धेचा, या सकंल्पनेचा उगम नेमका कोणासाठी व कसा झाला? आणि त्यामागे काय उद्दिष्टं होती? (Where this Idea(Bahurangi Bahar) Originated from? Who is it for? What are the reasons behind it?) स्पर्धेची निवड प्रक्रिया नेमकी कशी आहे? (What is the selection process for Bahurangi Bahar Spardha?) हे समजावून सांगणारा हा व्हिडिओ नक्की पहा. …(Do Watch this idea to understand Bahurangi Bahar…)

 

संपादक ‘वयम्’ 

शुभदा चौकर

ट्रॉफी, सर्टिफिकेट, पुस्तके अशी बक्षिसे मिळतातच. पण मोठ्ठे बक्षीस म्हणजे तिन्ही फेऱ्यांनंतर निवडल्या गेलेल्या सर्व मुलांसाठी व्यक्तिमत्त्व विकास शिबिर घेतले जाते. महाराष्ट्रभरातून निवडली गेलेली ही बहारदार मुलं शिबिरासाठी एकत्र येतात. डॉ आनंद नाडकर्णी आणि IPH चे मानसतज्ज्ञ त्यांना त्यांच्या विकासासाठी उपयुक्त शिदोरी देतात. आणि ही सर्व हरहुन्नरी मुलं एकमेकांच्या सहवासात आणखी फुलत जातात.
  • या स्पर्धेच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या अंतरंगात डोकवाल.
  • स्वतःला नीट ओळखाल.
  • तुमची मते मोकळेपणाने मांडण्याची अनोखी संधी मिळेल.
  • अनेक तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळेल.
  • मनात दाटलेले अनेक प्रश्न, शंका दूर होतील.
  • तुमचा बहुअंगांनी विकास होईल आणि तुमच्यातील क्षमता तुम्हांला समजतील.

>> इंटरेस्टिंग ४० प्रश्न म्हणजे ‘बहुरंगी बहर’ स्पर्धा!

>> प्रश्नावलीची उत्तरं तुम्ही मराठी/ इंग्लिश/हिंदी यापैकी कोणत्याही भाषेतून लिहू शकता.

>> १०० रुपये भरून नाव नोंदवा आणि प्रश्नावली डाउनलोड करा.

A Message From

Dr. Anand Nadkarni

v

Testimonials

What Parents are Saying

'ईशा लागू'च्या आज्जी सांगत आहेत 'ईशा'च्या 'बहुरंगी बहर' २०१९ मधील प्रवेशाबद्दल...

'अनौष्का कुलकर्णी'ची आई, सांगत आहे - 'अनौष्का'च्या 'बहुरंगी बहर' २०१९ मधील प्रवेशाबद्दल...

धनश्री शिंदे'चे आई-बाबा, सांगत आहेत - 'धनश्री'च्या 'बहुरंगी बहर' २०१९ मधील प्रवेशाबद्दल...